Belagavi

रामतीर्थ नगर येथे शिव-नंदी मूर्तीची प्रतिष्ठापना

Share

रामतीर्थ नगर येथील शिवशक्ती मंदिर विकास मंडळाच्या वतीने शिव आणि नंदी मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळसारोहण कार्यक्रम पार पडला.

महाशिवरात्रीच्या औचित्याने शिवशक्ती मंदिराचे संस्थापक सिद्राय कालखांबकर यांनी आसपासच्या परिसरातील भक्तांच्या विश्वासाने भारतीय शैव परंपरा जपली आहे, असे मत कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातील मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिराचे संस्थापक, कणबर्गी येथील लक्ष्मी – सिद्राय कालखांबकर या दाम्पत्याने गणेश चौकात मूर्तीची पूजा करून मिरवणुकीला चालना दिली. यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते देवस्थानातील नंदीची पूजा पार पडली. नूतन देवस्थानात मुरुगय्या शास्त्री यांच्या हस्ते विधीनुसार पूजा करण्यात आली.

यावेळी गुरुसिद्ध स्वामींनी उपस्थितांना उद्देशून बोलताना म्हटले, कि पुढील पिढीला देशाच्या संस्कृतीचे महत्व पटवून देण्यासाठी आपली संस्कृती जतन करणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे स्वामीजी म्हणाले.

रामतीर्थ नगर येथील समाजसेवक सुरेश यादव यावेळी बोलताना म्हणाले, आपल्या देशाची जन्मजात शक्ती ईश्वरभक्ती आणि अध्यात्मामध्ये आहे. अशा उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन आपल्याला मिळालेल्या ईश्वरी वारशाचे आपण जतन करावे, असा सल्ला त्यानीं दिला.

यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आपले विचार व्यक्त केले. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक स्थापन केलेल्या या मंदिराभिवती कंपाउंड आणि बोअरवेलची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (

यावेळी नगरसेवक हणमंत कोंगाली, प्रभू शिवनायकर, बापूजी हुलगूर, सत्याप्पा बेन्नी, रमेश कुंभार, बाबू जमनाळ आदी उपस्थित होते.

Tags: