Belagavi

युक्रेनमधून परतले राज्यातील चार विद्यार्थी : नोडल अधिकारी

Share

युद्धभूमी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची टप्प्याटप्प्याने सुटका करण्यात येत असून कर्नाटकातील चार विद्यार्थी मुंबई विमान तळावर सुखरुप पोहोचले असल्याची माहिती नोडल अधिकार्यांनीं दिली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यात येत आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बेळगाव स्मार्ट सिटी एमडी प्रवीण बागेवाडी आणि एसी रवी करलिंगणावर यांची नोडल अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी मुंबई गाठली आहे. युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची माहिती घेतली जात आहे.

बुडापेस्टहून एक विमान मुंबईत उतरले असून या विमानातून कर्नाटकातील चार विद्यार्थी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली असून सदर विद्यार्थ्यांमध्ये चिक्कबल्लापूर मधील एक आणि बेंगळूर मधील तीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे त्यांच्या घरी पाठविण्याचे काम केले जात आहे.

Tags: