Banglore

अटलबिहारी वाजपेयी क्रीडांगणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

बेंगळुरातील बोम्मनहळ्ळी मतदार संघातील एचएसआर ले आऊटमध्ये उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अटलबिहारी वाजपेयी क्रीडांगणाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज उदघाटन केले.

होय, बेंगळुरातील बोम्मनहळ्ळी मतदार संघातील एचएसआर ले आऊटमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज क्रीडांगण निर्माण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज त्याचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, क्रीडांगणाच्या उभारणीसाठी परीश्रम घेतल्याबद्दल आ. सतीश रेड्डी यांची प्रशंसा केली. आ. रेड्डी एकदा बोलले की ते काम पूर्ण करेपर्यंत थांबत नाहीत. या मतदार संघातील जनतेने त्यांना निवडून देऊन एका योग्य व्यक्तीला विधानसभेत पाठवले आहे. पुढील काळातही त्यांच्याकडून अशी अनेक विधायक विकासकामे होत राहतील यात शंका नाही. सतीश रेड्डी यांना एक लोकप्रिय आमदार म्हणण्यापेक्षा विकासप्रिय आमदार म्हणणे अधिक संयुक्तिक होईल असे बोम्मई म्हणाले.

मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, सरकार जनतेच्या समस्या सोडविण्याकडे अधिक लक्ष देत आहे. त्यामुळेच बेंगळूरची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मी योजना आखून पाठपुरावा करत आहे. बेंगळूरमध्ये काही ठिकाणी बस संचाराची समस्या आहे. बेंगळूर राष्ट्रीय स्तरावरचे शहर व्हायला हवे. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आदेश नुकताच जारी केला आहे असे ते म्हणाले. बाईट

या प्रसंगी महसूल मंत्री आर. अशोक, आ. सतीश रेड्डी, एमएलसी गोपीनाथ रेड्डी, बीबीएमपीचे प्रशासकीय अधिकारी राकेशसिंग, मुख्य आयुक्त गौरव गुप्ता आदी उपस्थित होते.

 

 

Tags: