शाळा–महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना मराठी भाषेचे विशिष्ट स्वरूप समजावण्यासाठी बेळगावातील राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी साहित्य व संस्कृती सुगंध‘ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले.

होय, मराठी भाषेचे सौंदर्य आणि वैशिष्ट्यांबाबत आजच्या युवकांना आणि समाजाला माहिती देण्याच्या उद्देशाने शहरातील एसकेई संस्था संचालित राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी साहित्य व संस्कृती सुगंध’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या संमेलनाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा अध्यात्मिक वारसा दर्शविणारी वारकरी दिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करून विध्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. 
एसकेई संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्याहस्ते या संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आरपीडी कॉलेजचे कन्नड विभागप्रमुख डॉ. एच. बी. कोलकर म्हणाले, कॉलेजमध्ये जागतिक मराठी भाषा दिन आम्ही दरवर्षी साजरा करतो. मराठी साहित्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांसारख्या थोर संतांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांच्या काळापासूनचे मराठी साहित्य वैश्विक साहित्याच्या तोडीचे आहे. भारतीय ज्ञान परंपरेत मराठी भाषेत उत्कृष्ट साहित्याची निर्मिती झालेली आढळते. मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य, त्यातील जीवनमूल्यांचा विध्यार्थ्यांना परिचय करून देण्यासाठीच्या संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जाते
यावेळी कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. शोभा नाईक म्हणाल्या, अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य, त्यातील सांस्कृतिक सुगंध, जीवनमूल्ये आणि त्याला लाभलेल्या वारकरी संप्रदायाची विध्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त या एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे असे सांगून अधिक माहिती दिली.
यावेळी बोलताना लेखिका प्रा. डॉ. माधुरी शानभाग म्हणाल्या, बेळगाव भागात मराठी भाषा, संस्कृतीचे संवर्धन, संरक्षण करण्याचे काम आरपीडी कॉलेज प्रारंभापासूनच करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरपीडी कॉलेजमध्ये आज मराठी भाषा दिनानिमित्त या संमेलनाचे आणि वारकरी दिंडीचे आयोजन केले आहे असे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे प्रमुख वक्ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, आरपीडी महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष संमेलनाचे आयोजन केले आहे. पारंपरिक वारकरी दिंडीने या संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या संमेलनात मराठी साहित्यावर आधारित चर्चासत्र, कविसंमेलन झाले. बेळगावपरिसरातील जनतेचा सहभागही आनंद देऊन गेला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
उदघाटन सत्रानंतर संमेलनात झालेल्या विविध सत्रांत अभिजात मराठी साहित्य यावर चित्रफीत प्रदर्शन आणि चर्चा झाली. डॉ. आय. एम. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. भुदरगडचे कवी गोविंद पाटील यांनी विशेष सादरीकरण केले. चौथ्या सत्रात मराठी भाषा आणि संस्कृती दर्शन, फुलराणी, पोवाडा आणि टाळ-मृदंगाच्या साथीने दिंडी नृत्य सादरीकरण झाले. संमेलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.


Recent Comments