Bailahongala

वीरशिरोमणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाचा शुभारंभ कला पथकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक

Share

राज्याच्या रक्षणासाठी धैर्याने लढा देऊन इतिहास घडविणाऱ्या राणी मल्लम्मा यांच्या उत्सवाला आज प्रारंभ झाला असून या उत्सवात राज्यातील विविध भागातील कलापथकांनी मिरवणुकीची शोभा वाढविली.

: बैलहोंगल तालुक्यातील मल्लम्मा यांच्या बेळवडी गावात कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या उत्सवाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यातील अनेक कलापथके, विविध वेषभूषेसह दाखल झाली होती. कलापथकाच्या सादरीकरणाने मिरवणुकीला वेगळा साज चढला होता.

सकाळी १० वाजता या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार महांतेश कौजलगी, काडा अध्यक्ष डॉ. विश्वनाथ पाटील, आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावातील मल्लम्मा चौकातील मल्लम्मा यांच्या पुतळ्याला तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विरज्योतीचे पूजन करर्ण्यात आले.

उपविभागाधिकारी शशिधर बगली यांच्याहस्ते बेळवडी संस्थानचा ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा रेणुका कुरी, उपाध्यक्ष सिद्दप्पा नंदिहळ्ळी, जिल्हा पंचायत माजी सदस्य शंकर मुडलगी, इराण्णा करेकट्टी, रोहिणी पाटील,, तालुका पंचायतीचे माजी सदस्य आर एस रोटेनावर, तहसीलदार बसवराज नागराळ, डीवायएसपी शिवानंद कटगी आदींसह अनेक मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत सामील झालेल्या कलापथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

वीर राणी बेळवडी मल्लम्मा संस्थांचे ध्वजारोहण करून विरज्योतीला अभिवादन करण्यात आले. मात्र यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Tags: