राज्यातील मूक अंडी कर्णबधिरांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह करत आज बेळगाव जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना निवेदन सादर करण्यात आले.

राज्यातील मूक आणि कर्णबधिरांना विविध सरकारी सुविधा मिळाव्यात, रोजगार उपलब्ध करून द्यावेत, स्वयंरोजगारासाठी धनसाहाय्य देण्यात यावे, अंगविकलांग विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात संघाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात यावे, अंगविकलांग प्रमाणपत्र देताना भेदभाव थांबवावा यासह अनेक मागण्यांचा आग्रह करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यासंदर्भात बेळगाव जिल्हा कर्णबधिर संघाचे कमार यांनी सांगितले कि गेल्या ८ वर्षांपासून सरकार मुकबधिरांना रोजगार व इतर सुविधा उपलब्ध करून देत नाही. अनेकजण रोजगारापासून वंचित आहे. यासह अनेक समस्यांचा सामना मूक आणि कर्णबधिरांना करावा लागत असून आमच्या मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण कराव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आहे, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे मूक आणि कर्णबधिरांसाठी विविध सुविधा मिळाव्यात यासह अनेक मागण्यांचा आग्रह करत निवेदन सादर करण्यात आले असून मूक आणि कर्णबधिरांना शासन न्याय देऊ शकेल का? हे पाहावे लागेल.


Recent Comments