Belagavi

बेळगावचे २ नोडल अधिकारी मुंबईला रवाना

Share

युक्रेनमध्ये अडकलेल्या कर्नाटकाच्या विध्यार्थ्यांना परत आणण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे असे जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.

बेळगावात सोमवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात २ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारने केली आहे.  स्मार्टसिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी आणि बेळगावचे प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगण्णावर यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना मुंबईला पाठवून देण्यात आले आहे. भारतीय विध्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत प्रयत्न करीत आहेत. अनेक विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे.  बाईट युक्रेनमध्ये अडकलेल्या विध्यार्थ्यांना पाणी-जेवणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिवाच्या भीतीने ते मायदेशी परतण्याची आस घेऊन बसले आहेत. त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री कारजोळ यांनी सांगितले.

 

Tags: