प्रसिद्ध गायक पं. भीमसेन जोशी अत्यंत प्रतिभावान गायक. त्यांच्यासारख्या महान व्यक्ती अनेक शतकानंतर अपवादानेच जन्मतात असे उद्गार प्रसिद्ध गायक गणपती भट यांनी काढले.

बेळगावातील सांस्कृतिक वेदिके, रंगसंपदा आणि होस्पेट येथील याजी प्रकाशनतर्फे रविवारी बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिरातील बसवराज कट्टीमनी सभागृहात शिरीष जोशी लिखित ‘भारतरत्न भीमण्णा’ या पुस्तकाचे प्रकाशन गायक गणपती भट यांच्याहस्ते झाले.
यावेळी बोलताना गणपती भट म्हणाले, या पुस्तकात पं. भीमसेन जोशी यांच्या जीवनाचे यथार्थ वर्णन लेखकाने केले आहे. अत्यंत काळजी घेऊन हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. त्यामुळे ते वाचनीय झाले आहे.

गणपती भट पुढे म्हणाले, लेखक शिरीष जोशी यांनी भीमसेन जोशी यांच्या जीवनाचा प्रदीर्घ अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. 1985 पासून ते पंडितजींच्या मृत्यूपर्यंत मलाही त्यांचा श्वास लाभला होता अशी आठवण भट यांनी सांगितली.
यावेळी नाटककार डॉ. रामकृष्ण मराठे, नाट्यकर्मी श्रीपती मंजनबैल, लेखक शिरीष जोशी, आर. टी. जंगल, याजी प्रकाशनच्या सविता याजी आदी उपस्थित होते.


Recent Comments