वीरराणी बेळवडी मल्लम्मा उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या वीर ज्योतीचे बेळगावात रविवारी उत्साहात स्वागत करण्यात आले.

फेब्रुवारी 28 ते मार्च 1 असे दोन दिवस बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी गावात वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त बेळगावात आज वीर ज्योतीचे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी पूजन करून स्वागत केले. फ्लो
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळवडी मल्लम्माचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोना कमी झाला आहे. तरीही कोरोना नियमावलीचे पालन करून दोन दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, बेळवडी मल्लम्मा पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम कित्तूर प्राधिकरणाच्या अनुदानातून करण्यात येत आहे. येत्या ५-६ महिन्यात हे काम पूर्ण होईल. उद्या बेळवडी मल्लम्मा यांच्या नावाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. बाईट
यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले, बेळवडी मल्लम्मा यांच्याबाबत कर्नाटकाला माहिती आहे. परंतु त्यांच्या शौर्याची गाथा देशभर पोहोचविण्याची गरज आहे. बाईट
तत्पूर्वी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, राणी चन्नम्मा यांच्यापेक्षाही आधी बेळवडी मल्लम्मा यांनी अपार शौर्य दाखवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर शिवरायांनीही त्यांना गौरविले होते. त्यांच्या विचारसरणीनुसार आपण वाटचाल केली पाहिजे. बाईट
यावेळी कन्नड व संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री यांच्यासह अधिकारी, नागरिक उपस्थित होते.


Recent Comments