दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्ग पूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी उत्साहात पार पडला.

व्हॉईस : शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे बाविसावे वर्ष आहे. २७ फेब्रुवारी या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतातील इतर नऊ राज्यातील १३१ हून अधिक गड-किल्ल्यांवर तसेच परदेशातील ६ किल्ल्यांवर एकाच वेळी विविध सरदार, संस्थानिक आणि राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्ग पूजा करण्यात आली. निपाणी येथील ऐतिहासिक निंबाळकर सरदार घराण्याचे वंशज दादासाहेब निंबाळकर आणि शिवाजी ट्रेलचे संयोजक रमेश रायजादे सुनील जाधव, परशराम मुरकुटे यांच्या हस्ते किल्ल्यावरील लेण्यांमध्ये ध्वज व दुर्ग पूजा संपन्न झाली.

यावेळी बोलताना श्रीमंत निंबाळकर सरकार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी 100 हुन अधिक गडकोट जिंकून स्वराज्यात आणले होते. मात्र आज त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. इतिहासाचे हे साक्षीदार आज नादुरुस्त होऊन नामशेष होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. याकडे लक्ष वेधण्यासाठी हा गडकोट पूजनाचा उपक्रम राबविण्यात येतो.
यावेळी दिलीप रायजादे, सचिन पाटील, सुभेदार सत्याप्पा बडिगेर, विजय बोगाळे, आदित्य जाधव, रामकृष्ण सांबरेकर, शिवानंद हिरेमठ यांच्यासह शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी उपस्थित होते.


Recent Comments