Belagavi

बहुमोल अधिवेशन काँग्रेसमुळे वाया : आ. दुर्योधन ऐहोळे

Share

राज्याच्या विकासावर चर्चेसाठी बोलावलेल्या 10 दिवसांचे बहुमोल अधिवेशन काँग्रेस आमदारांच्या गोंधळात वाया गेले अशी टीका रायबागचे . दुर्योधन ऐहोळे यांनी केली.

चिक्कोडीतील सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. ऐहोळे म्हणाले, आपापल्या मतदार संघातील जनतेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार अधिवेशनाला येतात. मात्र मंत्री ईश्वरप्पा यांच्या विधानाचा गैरअर्थ काढून आंदोलन करून, गोंधळ घालून काँग्रेस सदस्यांनी अधिवेशनाचे ३-१३ वाजविले. यातून त्यांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली. काँग्रेसच्या गोंधळामुळे र्मुख योजनांवर चर्चा करता आली नाही. याची प्रतिक्रिया जनतेतून उमटेल. पुढील निवडणुकीत जनता त्यांना चांगला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे आ. ऐहोळे यांनी सांगितले. बाईट

पत्रकार परिषदेला सदाशिव घोरपडे, राजू हरगनावर, अण्णासाहेब खेमलापुरे आदी उपस्थित होते.

Tags: