मुलाच्या जन्मापासून प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या पाल्यासाठी बरेच कष्ट घेतात. आपल्या मुलांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपल्या उतारवयातील आधार म्हणून आपल्या मुलांकडे पाहतात. परंतु अनेक मुलांकडून उतारवयात आपल्या आई वडिलांना दुर्लक्षित केले जाते. श्रवणबाळाच्या कथा तर आजकाल केवळ इसापनीती पुरत्याच मर्यादित राहिल्या असल्याची प्रचिती विजापूर मधील एका घटनेवरून येते….

विजापूरमधील डोळकेवाडी या गावातील एक घेरडे नावाचे कुटुंब.. नारायण घेरडे आणि अंबाबाई घेरडे दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी… यापैकी एका मुलाने कवळ संपत्तीच्या कारणास्तव आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष केले आहे. नारायण आणि अंबाबाई घेरडे हे दाम्पत्य वयोवृद्ध दाम्पत्य आहे. या दाम्पत्याला सिद्धू, जीवाप्पा आणि शोभा नावाची तीन अपत्ये आहेत… यापैकी सिद्धू नामक मुलाने संपत्तीसाठी आपल्या लहान भावाला वेगळे केले आहे असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आईवडिलांच्या उतारवयात आपल्यासोबत केवळ आपल्या वडिलांना घेऊन राहणाऱ्या सिद्धूने आपल्या आईलाहि वडिलांपासून दूर केल्याचा आरोप जीवाप्पाने केला आहे. 
अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा संपत्तीचा वाद आणि या वादामुळे सिद्धू याने आई वडिलांसह बहीण भावाचेही वैर घेतले आहे. कोणत्याही सण, समारंभासाठी माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या आपल्या बहिणीवरही सिद्धूने हल्ला केल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे.
केवळ संपत्ती आपल्या नावावर करून घेण्यासाठी सिद्धूने हा डाव रचल्याचा आरोप त्याच्या भावंडांनी केला आहे. यासंदर्भात न्याय मागण्यासाठी तिकोटा पोलीस स्थानकावर तक्रार देखील दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तेथील पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने या भावंडांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून विनंती केली आहे.
आपली मराठीसाठी, विजयकुमार सारवाड, विजापूर


Recent Comments