Belagavi

विजया उळेगड्डी यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन वचन सिरी आणि भावसिरी या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ

Share

जीवनाच्या अनुभवातून जो शिकतो तोच जीवन समृद्ध करू शकतो, असे मत तोंटदार्य मठाचे जगद्गुरू डॉ. तोंटद सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथे नागनूर रुद्राक्षी मठाच्या एसजीबीआयटी सभागृहात साहित्यिका विजया उळेगड्डी यांच्या साहित्यकृतींच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

विजया उळेगड्डी यांच्या वचन सिरी आणि भावसिरी या दोन साहित्यकृतींचे प्रकाशन नागनूर रुद्राक्षी मठात डॉ. तोंटद सिद्धरामय्या यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उद्देशून बोलताना डॉ. तोंटद सिद्धरामय्या म्हणाले, सर्वजण कवी होऊ शकत नाहीत. यासाठी अंतःकरणाचे भाव प्रकट करण्याचे समर्थ हवे असते. कवयित्री विजया उळेगड्डी यांच्या कविता या अभिव्यक्ती साहित्याचे उदाहरण असल्याचे मत स्वामीजींनी व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सरजू काटकर, डॉ. बसवराज जगजंपी, डॉ. गुरुदेव हुलेप्पनवरमठ यांनी दोन्ही साहित्यकृतींचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उळेगड्डी परिवाराच्यावतीने स्वामीजींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, प्रो. के. एस. कौजलगी, प्रो. एच के पाटील, आशा यमकनमर्डी, महांतेश उळेगड्डी, पुष्पा उळेगड्डी, एम आर उळेगड्डी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: