Chikkodi

राज्य भाषिक अल्पसंख्यांक शाळा शिक्षक संघाची स्थापना

Share

भाषिक अल्पसंख्यांक शाळांच्या विकासाच्या दृष्टीने भाषिक अल्पसंख्यांक शाळा शिक्षक क्षेमाभिवृद्धी संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे कर्नाटक राज्य भाषिक अल्पसंख्यांक शाळा शिक्षक क्षेमाभिवृद्धी संघटनेचे राज्याध्यक्ष मोहमद सलीम मुजावर यांनी सांगितले

चिक्कोडीत सरकारी नोकर भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोहमद मुजावर म्हणाले, राज्यातील भाषिक अल्पसंख्यांक शाळांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे.

त्यामुळे उर्दू, मराठी, तेलगू, तमिळ, अरेबिक, हिंदी, मल्याळमसह राज्यातील सर्व भाषिक अल्पसंख्यांक शाळा वाचविण्याची गरज आहे. त्यामुळे या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यातील एक भाषिक अल्पसंख्यांक शाळा दत्तक घेऊन तिचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  पत्रकार परिषदेला डी. एच. कांबळे, मीरासाब मुल्ला, मोहसीन पटेल, एस. एम. माने, झेड. ए. पटेल, ए. ए. पटेल, ए. ए. पिरजादे, आर. एम. पटेल, मुस्तफा पटेल आदी उपस्थित होते.

 

Tags: