Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय युवा मेळावा

Share

बेळगावात नेहरू युवा केंद्रातर्फे शनिवारी 2021-22 चा जिल्हास्तरीय युवा मेळावा आणि युवक मंडळांना क्रीडा साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेळगावातील बसवराज कट्टीमनी सभागृहात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना आणि कर्नाटक राज्य युवक मंडळ महासंघ आणि जिल्ह्यातील सर्व युवक मंडळे यांच्या संयुत विध्यमाने 2021-22 चा जिल्हास्तरीय युवा मेळावा आणि युवक मंडळांना क्रीडा साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. फ्लो

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. महेश पुजारी म्हणाले, संपूर्ण जगात भारतात युवावर्गाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. सरकारने आत्मनिर्भर भारत, स्कील इंडिया सारख्या योजनांतून युवा कौशल्याला वाव देण्याचे अभियान सुरु केले आहे. त्यांचा सदुपयोग करून घेऊन युवकांनी आपल्या कौशल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खा. मंगल अंगडी म्हणाल्या, युवकांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी म्हणून आज 457 युवक मंडळांना आज क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याचा मंडळाच्या सदस्यांनी सदुपयोग करून घेऊन आपले क्रीडा कौशल्य वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महावीर कॉलेजच्या प्राचार्या निर्मला गडाद, डीसीपी स्नेहा पी. व्ही., कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विद्यावती बजंत्री, डॉ. भरत अलसंबी, नेहरू युवा केंद्राचे निवृत्त जिल्हा समन्वयक एस. यु. जमादार, आर. आर. मुतालिक-देसाई, मल्लेश चौगुले, भरत कलाचंद्र, राज्य युवा पुरस्कार विजेते सिद्दण्णा दुर्दुण्डी, नेहरू युवा केंद्राचे बी. ए. दोडमनी, रोहित कलरा आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: