Belagavi

जिल्हा लेखिका संघातर्फे दत्ती कार्यक्रम

Share

दान करण्याची वृत्ती हवी. आणि या देणगीचा वापर साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांसाठी व्हावा, असे मत लेखिका संघाच्या अध्यक्षा डॉ. हेमावती सोनोळ्ळी यांनी व्यक्त केले.

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे शुक्रवारी जिल्हा लेखिका संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दत्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. हेमावती सोनोळ्ळी यांनी लेखिका संघाला यावेळी ५० हजार रुपयांची देणगी दिली.

यानंतर कार्यक्रमाला उद्देशून बोलताना डॉ. हेमवती सोनोळ्ळी म्हणाल्या, दान करण्याची वृत्ती हवी. आणि दानाच्या स्वरूपात मिळालेल्या देणगीचा वापर साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांसाठी व्हावा.

या कार्यक्रमात बेळगावच्या पुष्कला नृत्यालयाच्या वतीने जानपद गीतावर आधारित नृत्य कार्यक्रम पार पडला. जानपद कलाकार कलावती दोणवाडी यांनी जानपद गीत सादर केले.

यावेळी संघाच्या सदस्या डॉ. नीलगंगा चरंतीमठ, दीपिका चाटे, ज्योती माळी, वासंती मेळेद, रुद्राम्बिका याळगी, प्रेमा अंगडी, अक्कमहादेवी हुलगबाळी, सुनीता पाटील, शिवलीला पाटील, अन्नपुर्णा हिरेमठ, हेमा बरबरी, प्रभा पाटील, जयश्री निराकारी, श्रीलिंग जोशी, मधुकर गुंडेहट्टी, एस एस नंदेप्पन्नावर, एम वाय मेणशिणकाई, शिवानंद तल्लुर आदी उपस्थित होते.

Tags: