यमकनमर्डी मतदार संघातील अपंगांना स्वयंचलित वाहने वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते अपंग आणि ज्येष्ठ नागरिक पुनर्वसन खात्यातर्फे 2020-21 या वर्षासाठी देण्यात आलेली स्वयंचलित तिचाकी वाहने अपंग लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. 
तत्पूर्वी वन खात्यातर्फे तालुका पंचायत आवारात रोप लावण्याच्या कार्यक्रमाला आ. जारकीहोळी यांनी चालना दिली. यावेळी हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, तापं मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, तालुका नोडल अधिकारी होळेप्पा एच., चंद्रकांत तळवार, संजू करीगार, रमेश मादार, लाभार्थी बसवराज माळगी, सुनील कोळी, सुजाता चौगला, काडय्या हिरेमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments