Belagavi

आर. एल. एस. महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Share

के एल इ संस्थेच्या राजा लखनगौडा लॉ कॉलेज मध्ये शनिवारी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.’

महाविद्यालयाच्या केके वेणुगोपाल सभाभवनात अल्युमनी असोसिएशन आणि इंटरनल कॉलिटी अशुरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डिस्ट्रिक्ट जज सी एम जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याचप्रमाणे महाविद्यालय प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम आर कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 83 वर्षाचा इतिहास असलेल्या या महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.

या कार्यक्रमात बोलताना माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रसन्नकुमार यांनी सांगितले की माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने बुक बँक निर्माण करण्यात येणार आहे, यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे प्रत्येक वर्षी एक पुस्तकांचा संच याप्रमाणे प्रत्येकाने सहकार्य केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

या कार्यक्रमास न्यायाधीश सी एम जोशी, वि एन जोशी, ज्येष्ठ वकील एम आर कुलकर्णी, न्याक आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर समिना नाहिद बेग, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, महाविद्यालयाचे कर्मचारी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: