Chikkodi

३ कोटी रुपयांच्या खर्चातून रस्तेविकास आणि पुलनिर्मिती आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते शुभारंभ

Share

चिकोडी मतदार संघाच्या व्याप्तीत येणाऱ्या येडूर गावात आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते ३ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येत असलेल्या रस्ते विकास आणि पूल निर्मिती कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला.

कल्लोळ पूलपासून येडूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ३ कोटी रुपयांच्या खर्चातून रस्ते विकास आणि पूल निर्मिती कामकाजाचा शुभारंभ आज भूमिपूजनाने करण्यात आला.

यानंतर आपली मराठीला प्रतिक्रिया देताना आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितले कि, कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे येथील रस्ते संपूर्णपणे खराब झाले आहेत. येथे असलेल्या श्री वीरभद्रेश्वर देवस्थानाला मोठ्या संख्येने भाविक येतात.यामुळे साऱ्यांना सोयीस्कर मार्ग मिळावा यासाठी रस्ते विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय येडूर गावासाठी अधिकाधिक अनुदान मंजूर करून येडूर गावचा विकास हायटेक पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी चिदानंद कोरे साखर कारखान्याचे संचालक अजितराव देसाई, ग्राम पंचायत उपाध्यक्ष राहुल देसाई, ता पं माजी सदस्य पांडुरंग कोळी, पीकेपीएस उपाध्यक्ष अप्पासाहेब बेळवी, संजय पाटील, महेश कागवाडे, शिवानंद करोशी, अजित किल्लेदार, संजय पिराजी, विनायक चिक्कोर्डे आदी उपस्थित होते.

Tags: