एकीकडे हिंदू धर्मासाठी शिवमोगा येथील बजरंग दलाच्या हर्षची हत्या झाली आहे. आणि दुसरीकडे गांभीर्य नसलेले काँग्रेस नेते विधानसभेत अंताक्षरी खेळात असल्याची टीका माजी आमदार संजय पाटील यांनी केली आहे.

काँग्रेस जनविरोधी नीतीचा निषेध करत कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी येथे काँग्रेस विरोधातील जनजागृती सभेचे आयोजन भाजपाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस केवळ सत्तेला महत्व देत आले आहे. मात्र भाजप देशाची संस्कृती आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी प्राधान्य देत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायन्ना यासारख्या थोर वीरांनी आपली संस्कृती आपला देश वाचविला. त्यांचीच संस्कृती भाजप पुढे घेऊन जात असून काँग्रेस मात्र अद्यापही सत्तेच्याच मागे लागले असल्याची टीका संजय पाटील यांनी केली.
यानंतर कित्तूर आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, शिवमोगा येथे राष्ट्रध्वजसंदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्याबद्दल डीकेशी चुकीची माहिती पसरवून राज्यात तेथ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच गोष्टीचा मुद्दा मोठा करून विधानसभेत सभागृहाच्या कामकाजात आडकाठी करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस धोरणाचा निषेध करत भाजपने काँग्रेस विरोधातील जनजागृती सभेचे आयोजन करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.


Recent Comments