Belagavi

विजेच्या धक्क्याने मृत बालकाच्या कुटुंबाला मदत

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील गेजपती गावात विजेच्या धक्क्याने मरण पावलेल्या बालकाच्या कुटुंबाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी 5 लाख रुपये भरपाईचा धनादेश प्रदान केला.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील गेजपती गावातील दयानंद बसाप्पा तारिहाळ या बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत हेस्कॉमने दयानंद यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये भरपाई मंजूर केली आहे. या मदतीचा धनादेश एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते दयानंदचे वडील बसाप्पा तारिहाळ याना देण्यात आला.

यावेळी हेस्कॉम अधिकारी तसेच गावातील बसाप्पा बंडुगोळ, चंद्रू पाटील, नागराज बडिगेर, परशुराम सनदी, विठ्ठल कोलकार, संतोष बंडुगोळ आदी उपस्थित होते.

त्यानंतर पशु संगोपन खात्याच्या अमृत योजनेतून कुट्टलवाडी गावच्या महादेवी बाळप्पा पुजारी यांना दूध काढण्याचे यंत्र देण्यात आले. यावेळी पशु वैद्याधिकारी श्रीकांत गावे, शंकरगौडा पाटील आदी उपस्थित होते.

 

Tags: