Belagavi

आझादनगरात गादी कारखान्याला आग

Share

गादी कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपये किंमतीचे साहित्य कापूस जळून खाक झाल्याची घटना बेळगावातील आझाद नगरात घडली आहे.

लेक व्ह्यू हॉस्पिटलच्या मंगल बाजूस असलेल्या अझादनगरातील एका गादी कारखान्याला आज शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. आधी या ठिकाणी जाड धूर दिसून आला. त्यानंतर अचानक आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. पाहता-पाहता काही क्षणातच संपूर्ण गादी कारखान्याला आगीने वेढले आणि कारखान्यातील लाखो रुपये किंमतीचा कापूस व अन्य साहित्य भस्मसात झाले. दुकानमालक आणि स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे अग्निशामक दल आणि माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम हाती घेतले आहे.

 

 

 

Tags: