शिमोगा येथे झालेल्या बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ खानापुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी भव्य आंदोलन छेडले.

बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याचे छायाचित्र असलेले भव्य बॅनर घेऊन विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी गुरुवारी खानापुरात जोरदार निदर्शने करत हर्षच्या हत्येचा निषेध केला. त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निदर्शक कार्यकर्त्यांनी केली. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर ग्रेड-२ तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. 
यावेळी माजी आ. व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील, तालुका भाजप मंडळ अध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, पंडित ओगले यांच्यासह विहिंप आणि बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments