Khanapur

नंदगडमध्ये माजी आ. अरविंद पाटील यांचे जंगी स्वागत

Share

 भारतीय जनता पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश केल्यानंतर प्रथमच नंदगडमध्ये आगमन झाल्यानिमित्त माजी . अरविंद पाटील यांचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

होय, महाराष्ट्र एकीकरण समितीतून खानापूरचे आमदारपद भूषविलेल्या अरविंद पाटील यांनी नुकतीच म. ए. समितीला सोडचिठी देत बंगळुरात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. त्यानंतर आज ते प्रथमच मूळ गाव नंदगड येथे आले. त्यानिमित्त त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत केले. नंदगड  ग्रापं उपाध्यक्ष मन्नूर तहसीलदार, सदस्य नागेंद्र पाटील, नामदेव झुंजवाडकर, विठ्ठल पाटील, शांतीनाथ गरकट्टी, समीर हिरेकर  ,राजेंद्र फातार्डे, विकास लक्केबैलकर, सुरेश देगावकर आदी या जल्लोषात सहभागी झाले होते.    यावेळी शिवानंद तुरमुरी, रायनगौडा देमट्टी, गजानन गुणाजी आदी उपस्थित होते.

 

Tags: