Belagavi

युक्रेनमधील ‘त्या’ दहा विद्यार्थ्यांमध्ये बेळगावमधील २ विद्यार्थी

Share

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झाले असून युक्रेनमध्ये भारतातील १०० हुन अधिक विद्यार्थी अडकले आहेत. यामध्ये कर्नाटकातील १० विद्यार्थ्यांचा समावेश असून बेळगाव जिल्ह्यातील २ विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी पालकांनी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.

व्हॉइस : गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील रहिवासी अमोघ चौगला, आणि रायबाग तालुक्यातील कंकणवाडी येथील प्रिया भगवंत निदगुंडी हे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनी भारतात परत येण्यासाठी तिकीट बुकिंग केले होते. परंतु तेथून निघण्यापूर्वीच युद्धाची घोषणा झाली आणि युद्ध सुरु झाले आहे. यादरम्यान हे विद्यार्थी युक्रेन विमानतळावर अडकले असून पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी सातत्याने पालकांच्या संपर्कात असून विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, इमेलद्वारे मला हि माहिती उपलब्ध झाली असून दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. सदर विद्यार्थी सुखरूप आणि सुरक्षित आहेत याची माहिती घेण्यात आली आहे. २६ तारखेला विमानाचे तिकीट बुकिंग करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्र्यांना यासंदर्भात इमेलद्वारे माहितीही देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (बाईट)

यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी माहिती देताना सांगितले कि, शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले काही विद्यार्थी तेथील युद्धपरिस्थितीमुळे अडकले आहेत. भारतात परत येण्यासाठी त्यांनी विमान तिकीट बुकिंग केले होते. काही विद्यार्थी भारतात परत आले असून काही विद्यार्थी विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे अद्याप पोहोचले नाहीत. भारतातील विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना विनंती करून सातत्याने केंद्र सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संपर्कात आपण असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. (बाईट)

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धामुळे भारतातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली असतानाच कर्नाटकातील एकूण १० आणि यापैकी बेळगाव जिल्ह्यातील एकूण २ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. युद्ध परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मात्र भीती निर्माण झाली आहे.

Tags: