Belagavi

बेळगावात पोलीस कल्याण केंद्र, नव्या बॅडमिंटन हॉलचे उदघाटन

Share

 बेळगाव पोलीस मुख्यालय आवारातील बॅडमिंटन हॉल आणि नूतनीकरण केलेल्या पोलीस कल्याण केंद्राचे उदघाटन उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले.

उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांच्याहस्ते गुरुवारी बेळगाव पोलीस मुख्यालय आवारातील बॅडमिंटन हॉल आणि नूतनीकरण केलेल्या पोलीस कल्याण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

उदघाटन केल्यानंतर बोलताना पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार म्हणाले, बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे 200 कुटुंबांना खेळाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी या बॅडमिंटन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस कल्याण केंद्राचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचा सर्वानी सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस प्रमुख महानंद नंदगावी, डीएआर एसपी काश्यपनावर, सीएआर एसपी सिद्दनगौडा पाटील, डीएसपी शंकरगौडा पाटील, डीसीपी स्नेहा पी. व्ही., डीसीपी रवींद्र गडादी, नगरसेवक बाबाजान मतवाले, माजी नगरसेविका जयश्री माळगी आदी उपस्थित होते.

 

 

Tags: