शिमोगा येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ हुक्केरीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निषेध मोर्चा काढून आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची शिमोगा येथे समाजकंटकांनी नुकतीच हत्या केली. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. हुक्केरी येथेही बजरंग दल कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी कोर्ट सर्कलमधून हत्येचा निषेध करत मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी हत्येतील आरोपींच्या अटकेसाठी जोरदार घोषणाबाजी केली. मिनी विधानसौधवर मोर्चा नेऊन तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. 
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बजरंग दलाचे नेते कुंभार म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी नेत्यांवर वारंवार हल्ले करण्यात येत आहेत. सरकारने यातील आरोपीना अटक करून कठोर शिक्षा द्यावी. जेणेकरून असे हल्ले करण्याचे धाडस कोणी करू नये. यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments