Belagavi

पल्स पोलिओचे ३ वर्षांचे मानधनच नाही ! यंदा बहिष्काराचा इशारा

Share

गेल्या वर्षांतील पल्स पोलिओ मोहिमेतील सेवा कार्याचे मानधन मिळाल्याशिवाय यंदाच्या मोहिमेत आम्ही भाग घेणार नाही असा इशारा सिटू प्रणित कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या बेळगाव तालुका शाखेने दिला आहे. 

होय, बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी विभागातील गणेशपूर, हिंडलगा, मंडोळी, हंगरगा आणि बेळगुंदी गावातील अंगणवाडी कार्यकर्त्यांना 2019, 2020 आणि 2021 या वर्षांत राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ कार्यक्रमात केलेल्या कामाचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे चिडलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सिटूच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानधनासाठी धरणे धरली. फ्लो

यावेळी बोलताना सिटूच्या नेत्या मंदा नेवगी म्हणाल्या, 2019, 2020 आणि 2021 या वर्षांत राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ कार्यक्रमात आम्ही सेवा दिली आहे. त्याचे मानधन आम्हाला अद्याप देण्यात आलेले नाही. आम्ही याबाबत विचारणा केल्यास आज देतो, उद्या देतो, म्हणून टोलवाटोलवी करण्यात येत आहे. आज सभा घेऊन तालुका अधिकाऱ्यांनी आम्ही मानधन देऊ, तुम्ही समाजाचे काम करताय असे म्हटले. आम्ही समाजाचे काम करतोय, पण राबले पैसे आम्ही मागतोय. दिवसाचे केवळ 75 रुपये मागतोय, अधिकचे पैसे नव्हे. थकीत मानधन मिळेपर्यंत आम्ही पल्स पोलिओ मोहिमेचे काम करणार नाही असा इशारा नेवगी यांनी दिला.

या निदर्शनात ए. व्ही. पाटील, एस. एस. बोकडे, आर. एस. तारिहाळकर यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 

 

Tags: