Belagavi

सर्वांशी चर्चेनंतरच अरविंद पाटील भाजपमध्ये : संजय पाटील

Share

खानापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः चर्चा केल्यानंतरच माजी . अरविंद पाटील यांनी पक्षात प्रवेश केला आहे असे स्पष्टीकरण भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी . संजय पाटील यांनी दिले.

बेळगावात गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. संजय पाटील म्हणाले, अरविंद पाटील पक्षात येण्यापूर्वी एक महिना आधीच मी स्वतः पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. इतकेच नाही तर दोन दिवसांपूर्वीची मी स्वतः त्यांना याबाबत माहिती दिली आहे. कोणत्याही अति-शर्तींशिवाय अरविंद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावरून माझ्याकडे कोणीही नाराजी-असमाधान व्यक्त केलेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या विरोधात काम केलेल्याना पक्षात कसे घेताय? या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले, परिवर्तन होत आहे, त्याचे स्वागत करूया. राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात येत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीत असताना विरोधात बोलायचे. आता आमच्याकडे आलेत, त्यांची विचारधारा बदलेल असा त्याचा अर्थ. त्यामुळे स्वागत करूया. आमच्या भाजपमध्ये अभ्यास वर्ग, संस्कार शिबीर असतात. त्यामुळे सगळ्यांना बदलण्याची शक्ती आमच्या पक्षात, नेत्यात आहे असे त्यांनी सांगितले.

मंत्री उमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखालील सभेत बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांमधील नाराजी व्यक्त झाली का या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले, आमच्या कोणी नाराज नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. घरात नवरा-बायकोची भांडणे होतातच. मोठा पक्ष आहे, कोणी नाराज असेल तर त्याची नाराजी दूर करत पक्ष पुढे नेत  आहोत असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील काँग्रेस आमदार भाजपात येणार असल्याच्या रमेश जारकीहोळी यांच्या विधानाबाबतच्या प्रश्नावर, त्याबाबत मला काही माहिती नाही. जर कोणी आले तर त्यांचे स्वागतच करू अशी प्रतिक्रिया संजय पाटील यांनी व्यक्त केली.

एकंदर, आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत असे संजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

Tags: