विविध सामाजिक कामे करण्यात बेळगावातील नियती फौंडेशन आघाडीवर आहे. फौंडेशनच्या या कामांची दखल घेऊन मीना मालगावे आणि त्यांचे सुपुत्र सुमित मालगावे यांनी फौंडेशनला १ लाख रुपयांची देणगी दिली.

आपले पालक श्रीमती शालिनी आणि श्री. चंद्रकांत मालगावे यांच्या स्मरणार्थ मालगावे माय-लेकानी ही देणगी दिली. नियती फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी ही देणगी स्वीकारून मीना मालगावे आणि त्यांचे सुपुत्र सुमित मालगावे यांचे आभार मानले.


Recent Comments