साधना क्रीडा केंद्र, बेळगाव पुरस्कृत नवज्योत खो–खो संघटना सुळगा–उचगाव आयोजित खो–खो स्पर्धेत कडोली संघाने विजेतेपद पटकावले.

एक गाव-एक संघ’ या नियमानुसार घेण्यात आलेल्या या खो-खो स्पर्धेत येळ्ळूर, सुळगा, तुरमुरी, सुळगा-उचगाव, कोडोली आदी संघानी भागघेतला होता. अंतिम सामन्यात कडोली संघाने शानदार प्रदर्शन करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना प्रथम पारितोषक शिवानंद कोरे यांच्या मातोश्री विमल चंद्रकांत कोरे यांच्या स्मरणार्थ १० हजार रुपये रोख बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी श्रीकांत मोरे, बाळू पाटील, भागण्णा नरोटी, मारुती पाटील, सागर सांगावकर, महादेव कंग्राळकर, मल्लप्पा सुळगेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments