बेळगावातील वीरभद्र नगरातील जेल परिसर कॉलनीत गेल्या ३ दिवसांपासून झाडा–झुडपांत अडकलेल्या एका वासराची एसडीआरएफच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने सुखरूप सुटका केली.

होय, बेळगाव शहरातील पोलीस मुख्यालयाशेजारील वीरभद्र नगरातील जेल परिसर कॉलनीत गेल्या ३ दिवसांपासून झाडा-झुडुपांत अडकलेल्या एका वासराची एसडीआरएफच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने काळ रात्री सुखरूप सुटका केली. गेल्या ३ दिवसांपासून हे वासरू तेथे अडकल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक बाबाजान मतवाले यांना दिली. मतवाले यांनी वासराच्या खाण्यापिण्याची सोय करून याबाबत एसडीआरएफच्या कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोराच्या सहाय्याने झाड-झुडपात अडकलेल्या वासराची सुखरूप सुटका केली. 
याबाबत माहिती देताना एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी सांगितले की, वीरभद्र नगरात वासरू अडकून पडल्याची माहिती देणारा फोन आम्हाला आला. त्यानुसार येथे येऊन आम्ही त्या वासराची सुटका केली असून ते सुखरूप आहे.
यावेळी एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी, मार्केट स्थानकाचे पोलीस उपस्थित होते.


Recent Comments