Belagavi

मिरजेतील सचिन हॉस्पिटलतर्फे मोफत स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण शिबिर

Share

अनेक दिवसांपासून संतानप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या दाम्पत्यांसाठी मिरजेतील सचिन हॉस्पिटलतर्फे मोफत स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारणासाठी सचिन हॉस्पिटल नामवंत आहे. येथे अत्याधुनिक उपचारांनी वंध्यत्व निवारण केले जाते. योग्य उपचारांनी टेस्ट ट्युबद्वारे संतानप्राप्ती करून देण्यात येते. येथे स्त्रीरोगांवर अत्याधुनिक मशिनद्वारे उपचार करण्यात येतात. स्त्रीरोगांवरील उपचार आणि वंध्यत्व निवारणासाठी सचिन हॉस्पिटल सुप्रसिद्ध आहे. गेल्या रविवारी, दि. 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत येथे मोफत स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आले. यावेळी संतानप्राप्तीसाठी इच्छुक अनेक दांपत्यांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी करवून घेत उपचारांबाबत सल्ला घेतला. सचिन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सचिन सुगन्नावर व डॉ. नेहा यांनी शिबिरार्थींची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करून सल्ला दिला.

 

Tags: