शिवमोगा येथे हिंदू कार्यकर्त्याच्या झालेल्या हत्येचा निषेध करत अथणी येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील शिवाजी चौकपासुन पदयात्रेच्या माध्यमातून आंबेडकर सर्कल ते शिवयोगी चौकापर्यंत जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा देत शिवमोगा येथे झालेल्या हत्येचा निषेध नोंदविला.
हर्षची हत्या केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच अशा प्रकारच्या कृत्यांवर राज्यसरकारने आळा घालावा, अशा आशयाचे निवेदन अथणी तहसीलदार दूंडाप्पा कोमार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यासंदर्भात आरएसएस उत्तर विभागाचे सहसंचालक अरविंदराव देशपांडे यांनी सांगितले की, शिवमोगा येथे झालेल्या हर्ष च्या हत्येचा आपण निषेध नोंदवत असून हर्ष च्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी आपण आग्रह करत आहोत. अथणी वकील संघातर्फे 25000 आणि वैयक्तिकरीत्या अथणी येथील कंत्राटदार नानासाहेब अवताडे यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
अथणी येथे छेडण्यात आलेल्या या आंदोलनात नानासाहेब अवताडे, सूनील देसाई, प्रदीप नंदगाव, सुशील पत्तार, बि.डी. कडोली, कुमार पडसलगी, विनय पाटील, अभय सगरी, सचिन देसाई, राजू नायक, अथर्व देशपांडे, महांतेश गुड्डापुर, हनमेश अन्नेप्पनवर, प्रदीप जाधव, महेश कनशेट्टी, प्रदीप तेली, शंभू तेरदाळ, किरण गुरव, राघव कट्टी, विक्रम डोंगरे, सुशांत साळुंखे, अक्षय कोळलगी, विजय पवार, आकाश नंदगाव आदींसह अनेक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments