Chikkodi

यरगुप्पीत धनगर युवतीवर अत्याचाराचा चिक्कोडीत निषेध

Share

 कुंदगोळ तालुक्यातील यरगुप्पी गावात बकऱ्याशेळ्या राखणाऱ्या धनगर समाजाच्या एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ चिक्कोडी तालुका कुरुबर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन दिले.

यावेळी बोलताना कर्नाटक राज्य कुरुबर संघटनेच्या चिक्कोडी तालुका शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण डांगेर म्हणाले, युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करावी. तसेच भटक्या धनगरांच्या रक्षणासाठी योग्य कायदा जारी करावा अशी मागणी केली.

यावेळी कर्नाटक राज्य कुरुबर संघटनेचे संचालक ऍड. एच. एस. नसलापुरे, विनायक बनहट्टी, ऍड. सुनील करगावी, शिवानंद मऱ्यायी, महादेव कवलापूरे, रामण्णा बनहट्टी, एम. के. पुजारी, सिद्द्पा डांगेर, लक्ष्मण पुजारी    यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Tags: