Belagavi

अगसगा येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

Share

 ग्रामीण भागातील खेळाडूंनी विविध खेळांत भाग घेऊन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करावी असे आवाहन युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील अगसगा येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन केल्यावर बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले, विध्यार्थ्यानी अभ्यासासोबतच खेळांकडेही लक्ष देऊन त्यात नाव कमवावे.

विध्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळांमध्येही प्राविण्य मिळवता यावे यासाठी सतीश जारकीहोळी फौंडेशनतर्फे अनेक उपक्रम राबवून मदत देण्यात येत आहे. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. उच्च ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास खेळांमध्ये यश मिळवता येते असे राहुल यांनी सांगितले.

यावेळी राजू मायाण्णा, प्रेम नरोटी, चिन्नम्मा तिरमाळे, भैरू कंग्राळकर, अप्पय्यगौडा पाटील, गुंडू करेन्नावर, अमृत मुद्देन्नवर, संतोष लाड, लक्ष्मण कंग्राळकर आदी उपस्थित होते.

 

 

Tags: