Belagavi

आर्य ईडीग समाजाच्या विकासाची मागणी

Share

 आर्य ईडीग समाजाच्या विकासासाठी सरकारने ब्रह्मश्री नारायण गुरु ईडीग विकास महामंडळ स्थापन करून त्याला ५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी बेळगाव जिल्हा आर्य ईडीगर संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

संघाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकात आर्य ईडीग समाजाची ५० लाखांहून अधिक लोकसंख्या असून, उपजाती आहेत. शिंदीपासून दारू गाळून विकणे हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र त्यावर बंदी घातल्याने आर्य ईडीग समाजाचे नागरिक आर्थिक संकटात आहेत. हा समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे.

त्यामुळे सरकारने लक्ष देऊन समाजाच्या विकासासाठी ब्रह्मश्री नारायण गुरु ईडीग विकास महामंडळ स्थापन करून त्याला ५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. या अनुदानातून या समाजातील निराश्रितांचे पुनर्वसन करावे, बेरोजगारांना रोजगार, स्वयंरोजगार द्यावा आणि समाजाच्या विकासाचे काम करावे असे आवाहन मुख्यमंत्र्याना या निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

 

Tags: