शिमोगा येथे हर्ष नामक युवकाच्या हत्येप्रकरणामागचे सत्य सरकारने जाहीर करावे अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी आज केली.

हुक्केरी येथे मंगळवारी तालुका पंचायतीतर्फे यमकनमर्डी मतदार संघातील ग्राम पंचायतींना स्वच्छ कचरा विल्हेवाट वाहनांचे वितरण केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आ. जारकीहोळी म्हणाले, राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक अनुचित घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. आता तर खुद्द गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हर्ष या युवकाची संशयास्पद हत्या करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांचेच सरकार सत्तेवर आहे. आता यांनी तातडीने हर्षच्या मारेकऱ्यांना गजाआड करून हत्येमागचे सत्य जाहीर करावे अशी मागणी आ. जारकीहोळी यांनी केली
दरम्यान, कार्यक्रमात कब्बूर गावचे ज्येष्ठ नागरिक बुतप्पा वडेयर यांनी आ. जारकीहोळी यांचा सत्कार केला. यावेळी तालुका पंचायत प्रशासिका उमा सालीगौडर, मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, आर. ए. चट्टी, श्रीशैल हिरेमठ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, ग्रापं अध्यक्ष, पीडीओ उपस्थित होते.


Recent Comments