जलजीवन मिशन योजनेच्या विविध टप्प्यातील तांत्रिक कर्मचारी आणि कंत्राटदारांसाठी बेळगावात २ दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

बेळगावातील कार्ड्स हॉटेलमध्ये जिल्हा पंचायत आणि ग्रामीण पेयजल आणि निस्सारण विभागातर्फे जलजीवन मिशनच्या विविध टप्प्यातील तांत्रिक कर्मचारी आणि कंत्राटदारांसाठी २ दिवसांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांनी रोपट्यानं पाणी देऊन कार्यशाळेचे उदघाटन केले.
कार्यशाळेचे उदघाटन करून बोलताना सी. जी. हुलीमनी म्हणाले, देशातील ग्रामीण भागाला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सरकारने जलजीवन मिशन योजना हाती घेतली आहे. या योजनेत अंलबजावणीच्या विविध टप्प्यात असलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदारांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय कचेरीकडून २ दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
यावेळी बोलताना ग्रामीण पेयजल आणि निस्सारण विभागाचे अभियंता चंद्रशेखर मसगुप्पी म्हणाले, जलजीवन योजनेची परिणामकारक अमलबजावणी करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. योजनेचे काही निकष, धोरणे बदलली आहेत. त्याबाबत तुम्हाला पूर्ण माहिती मिळालेली नाही. ती देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे.
याप्रसंगी जिपं सीईओ दर्शन एच. व्ही., अधीक्षक अभियंता सी. जी. हुलीमनी, आदित्य इंजिनिअरिंग कंपनीचे सचिन उसूलकर, कार्यकारी अभियंता शिवानंद आदी उपस्थित होते.


Recent Comments