ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने समोरून जाणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याने एकजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात बैलहोंगलजवळील एम. के. हुबळी रस्त्यावर आज झाला.

एम. के. हुबळीजवळील रस्ता खराब झाला असून, खड्डे चुकविण्याच्या नादात कारचालकाने ओव्हरटेक करताना समोरून जाणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. तर पाठीमागे बसलेला जखमी झाला असून त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. जखमींना स्थानिक इस्पितळात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी बेळगावच्या जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आले.
महारुद्रप्पा बन्नूर, रा. होळेहोसूर असे एका जखमीचे नाव असून दुसऱ्या जखमीचे नाव समजू शकलेलं नाही. कार आणि मोटरसायकल बैलहोंगलहून एम. के. हुबळीच्या दिशेने येताना हा अपघात झाला.


Recent Comments