हिजाब विरोध भगवा हा वाद विजापूर जिल्ह्यात संपण्याची चिन्हे नाहीयेत. आता हिजाब घालून वर्गात बसण्याची मुभा द्यावी या मागणीचे निवेदन विध्यार्थ्यानी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. वर्गात हिजाब घालू न दिल्याबद्दल प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकलेल्या सरकारी पीयुसी आणि डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याठिकाणी त्यांना हिजाब घालून प्रवेश करू देण्यात आला. घोळका करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा विचार चालविला होता.



Recent Comments