Vijayapura

विजापूर क्रीडांगणातील सिंथेटिक ट्रॅकची दुरवस्था

Share

विजापूर शहरात असलेल्या आंबेडकर क्रीडांगणामधील सिंथेटिक ट्रॅकची अयोग्य देखभाली मुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे क्रीडापटू अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

विजापूर शहरातील जिल्हा क्रीडागणामध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी पाच कोटी रुपयांच्या खर्चातून सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात आली होती. विजापूर जिल्ह्यातील युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ट्रॅकची योग्य काळजी न घेतल्याने या ट्रॅकची नासधूस झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे क्रीडांगणावर येणाऱ्या क्रीडापटूंना अडचणी निर्माण होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

विजापूर मधील अनेक क्रीडापटू राज्यस्तरावर, राष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करत आहेत. क्रीडापटूंना सरावासाठी सोयीस्कर व्हावे या दृष्टिकोनातून या सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु या सिंथेटिक ट्रॅक वर बहुतांशी वेळा नागरिक वावरताना दिसत आहेत. यामुळे क्रीडापटूंना प्रॅक्टिस करताना अडचणी निर्माण होत आहेत. सदर सिंथेटिक ट्रॅकच्या देखभालीसाठी प्रत्येक खेळाडूकडून दरमहा 300 रुपये आकारले जातात. या माध्यमातून लाखो रुपये जमा होतात. हे पैसे कुठे जातात? असा सवाल उपस्थित करत क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक एस.जी. लोणी यांच्या दुर्लक्षामुळे सिंथेटिक ट्रॅक बिघडल्याचा आरोप क्रीडापटू करत आहेत. याचप्रमाणे क्रीडापटूंसाठी सरकारच्यावतीने पुरविण्यात येणारी सामुग्रीदेखील क्रीडापटूपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपासंदर्भात लोणी यांनी सांगितले की, या महिन्यापासून सिंथेटीक ट्रॅक चा वापर सर्वसामान्य जनतेसाठी बंद करण्यात येणार आहे.

कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेले सिंथेटिक ट्रॅक सध्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बिघडल्याचा परिस्थितीत आहे. क्रीडा विभागाचे अधिकारी या सिंथेटिक ट्रॅकच्या व्यवस्थापनात कुचकामी ठरल्याचा आरोप क्रीडापटूंचा वतीने करण्यात येत आहे.

Tags: