राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी काँग्रेस पक्ष सभागृहात लढत आहे. मात्र भाजप सरकारला हे दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही. आम्ही प्रामाणिकपणे लढा देत आहोत, अशी प्रतिक्रिया ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे.

बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविण्याचे विधान मंत्री ईश्वरप्पा यांनी केले होते. हे विधान देशद्रोही असून आम्ही राष्ट्रध्वजाचा सन्मानासाठी खर्या अर्थाने लढत आहोत. आणि आम्ही आमच्या पक्षासोबत प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
जनतेची कोणतीही काळजी न करता केवळ ईश्वरप्पा यांच्या विधानावर सभागृहात काँग्रेसच्या वतीने संघर्ष सुरू आहे सभागृहाचा वेळ वाया घालविला जात आहे असा सवाल प्रसारमाध्यमांनी उपस्थित करताच या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपवर निशाणा साधत राज्यातील जनते संदर्भात कोणाला किती काळजी आहे? हे सर्व जनतेला माहित असल्याचा टोला लगावला. पूरग्रस्त, कोविड मृतांच्या कुटुंबियांना न मिळालेली नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसून राज्यातील जनतेविषयी कुणाला किती काळजी आहे हे यावरून स्पष्ट होते असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाने जनतेसाठी हाती घेतलेले कार्यक्रम साऱ्यांना माहिती आहेत. मी काँग्रेस च्या बाजूने नाही तर राष्ट्रध्वजाच्या झालेल्या अवमानाविरोधात लढा देत असल्याचे आमदार हेबाळकर म्हणाल्या.
ईश्वरप्पांनी केलेल्या राष्ट्रध्वजा संदर्भातील विधानावर राज्यभरात काँग्रेसच्यावतीने विरोध व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसने हा विषय सभागृहात उचलून धरला असून आगामी काळात हे प्रकरण कुठवर पोहोचेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Recent Comments