तरुण मुलींमध्ये पौगंडावस्थेमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांची माहिती देण्यासाठी समाजसेविका राजश्री मुनोळी यांच्या उपस्थितीत सुरेश यादव फाउंडेशनच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रामतीर्थ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. . 
यावेळी राजश्री मुनोळी यांनी उपस्थित मुलींना मासिक धर्म, आणि यादरम्यान होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांसंदर्भात तसेच बालविकास, पोषण, लैंगिकता या विषयावर माहितीपर व्याख्यान दिले. विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या उपयुक्त माहितीबद्दल राजश्री मुनोळी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेच्या SDMC चेअरपर्सन ज्योती बेन्नी यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी मुलींच्या आरोग्याशी निगडित माहितीपर पुस्तक भेटीदाखल दिले. या कार्यक्रमाला श्रीमती मेळवंकी, SDMC उपाध्यक्ष लक्कुराजा होडलुरा, सेवानिवृत्त कॅनरा बँक व्यवस्थापक मनोहर संकेश्वरी आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments