Belagavi

श्रीशैल येथे यात्री निवासासाठी अधिक अनुदानाची मागणी सभागृहात पी राजीव यांनी उठविला आवाज

Share

रायबाग मतदार संघात नूतन पशु रुग्णालयासाठी सभागृहात आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी आवाज उठविला. याचप्रमाणे कुडची आमदार पी राजीव यांनी श्रीक्षेत्र श्रीशैल येथे भक्तांसाठी यात्री निवास उभारण्यासाठी अधिक अनुदान मंजूर करण्याची मागणी केली.

सभागृहात काँग्रेसच्या सुरु असलेला गोंधळावेळी सोमवारी प्रश्नोत्तर कालावधीत आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी चिंचली येथे पशुवैद्यकीय संस्थेच्या इमारत दुरुस्तीसाठी देण्यात आलेला निधी हा अपूर्ण असल्याचे सांगत अधिक निधी मंजूर करण्याचा आग्रह केला. या रुग्णालयाच्या पुढील कामकाजासाठी अधिक निधींजी गरज असून अतिरिक्त निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी केली.

या मागणीला अनुसरून मंत्री प्रभू चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, यासंदर्भात अर्थसंकल्पात समावेश करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली असून आपल्या मागणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी कुडची चे आमदार पी राजीव यांनी श्रीशैल येथील भक्तांसाठी यात्री निवास उभारण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. नव्या समुदात भवनासाठी १ कोटी २४ लाखांचा निधी देण्यात आला असून इतका निधी यात्रेकरू निवास उभारण्यासाठी पुरेसा नसल्याचे सांगत यात्री निवास साठी अधिक निधी मंजूर करण्याची विनंती केली.

यासंदर्भात मंत्री शशिकला जोल्ले यांनी मागणीचा विचार करून वरिष्ठांशी चर्चा करून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Tags: