मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या विधानाच्या निषेधार्थ हुक्केरी आणि संकेश्वर ब्लॉक काँग्रेस च्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

विजय रवदि आणि संतोष मुडसी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मंत्री ईश्वरप्पा यांच्या विधानाचा निषिद्ध व्यक्त करत हुक्केरी शहरातील कोर्ट सर्कल जवळ शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय रवदि यांनी सांगितले कि, मंत्री ईश्वरप्पा यांनी राष्ट्रध्वजसंदर्भात अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, असा आग्रह त्यांनी केला.
संकेश्वर नगरपालिका सदस्य दिलीप होसमनी यांनीही मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आंदोलकांनी प्रशासकीय भवनासमोरून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी शहानुर तहसीलदार, बसवराज पाटील, रेखा चिक्कोडी, स्लिम कलावंत, कबीर मलिक, राजू सिदनाळ, महेश गुमची, दस्तगीर कागवाडे, भीमगौडा अम्मानगी आदींसह इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments