उत्तरेतील गंगा आरतीप्रमाणे दक्षिणेत तुंगा आरती करण्यासाठी दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर येथे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 108 योगमंडप निर्माण कार्याची कोनशिला बसवली.

हरिद्वार येथे दररोज भव्य प्रमाणात गंगा आरती करण्यात येते. त्या धर्तीवर हरिहर येथे तुंगभद्रा नदी तीरावर तुंगा आरती करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडला आहे. यासाठी हरिहर येथे 108 योगमंडप बांधण्यात येणार आहेत. या कामाची आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोनशिला बसवली. 
यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी हरक्षेत्र येथील पंचमसाली पिठाला भेट देऊन जगद्गुरू वचनानंद स्वामी यांचे आशीर्वाद घेतले. पंचमसाली पिठाचे जगद्गुरू वचनानंद स्वामी, मंत्री बी. ए. बसवराज, मुरुगेश निराणी, खा. जी. एम. सिद्धेश्वर आदी उपस्थित होते. 


Recent Comments