मनपा महसूल कर्मचाऱ्यांनी यंदाही महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंजुरी आणि नूतनीकरणासाठी व्यापार परवाने तपासण्याची मोहीम सुरु करावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी केले.

मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी आज पालिका सभागृहात महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त सभा घेतली. मनपाचे यंदाचे आर्थिक वर्ष पुढील महिन्यात संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाही विक्रमी 50 कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात हयगय करू नका, थकीत करवसुली करण्यासाठी परीश्रम घ्या असे आवाहन त्यांनी केले. 
व्यापार परवाने मंजूर करताना आरोग्य विभागाने जागेची पाहणी केली पाहिजे. शहरातील 6000 हुन अधिक व्यावसायिकांनी व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण करून घेतलेले नाही. त्यांच्यावर कठोर कारवाईची मोहीम सुरु करा अशा सूचना आयुक्त घाळी यांनी दिल्या.
सभेला आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, प्रभारी महसूल उपायुक्त महादेव बन्सी यांच्यासह विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments