Khanapur

रस्ता डांबरीकरणाला आ. अंजली निंबाळकर यांनी दिली चालना

Share

खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी क्रॉस ते देवाचीहट्टी पर्यंत आणि सीआरपीएफ कोब्रा प्रशिक्षण केंद्रापर्यंतच्या 2 किमी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला . अंजली निंबाळकर यांनी भूमिपूजन करून चालना दिली

होय, खानापूर तालुक्यातील देवाचीहट्टी गावात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 195 लाख रु निधीतून    हब्बनहट्टी क्रॉस ते देवाचीहट्टी पर्यंत आणि सीआरपीएफ कोब्रा प्रशिक्षण केंद्रापर्यंतच्या 2.06 किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या कामाचे आ. निंबाळकर आणि ग्रामस्थांच्या हस्ते कुदळ पूजन करून चालना देण्यात आली.     

यावेळी बोलताना आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, कोणी काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नका. गेल्या 60 वर्षांत तुम्ही जो त्रास भोगलाय तो इतरांनी भोगलेला नाहीय. कोणीही नेता-पुढारी असो, त्यांची मुले चांगले शिक्षण घेण्यासाठी पुणे-बंगळुरात आहेत. तुमची मुले या खड्ड्यांच्या रस्त्यातून शाळेला जातात-येतात.  तुमच्या आधीच्या नेत्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे थांबवायला हवे. तुम्ही सगळे मोठे आहात, सगळं अनुभव घेतला आहे. या जांबोटी परिसरातील एखादा अपवाद वगळता सर्व रस्ते झाले आहेत. शिल्लक रस्तेही सुधारण्यात येतील. ही कामे मीच सर्वप्रथम करत आहे, पुढील काळातही अशीच विकासकामे करत राहणार आहे असे आ. निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी देवाचीहट्टी परिसरातील ग्रामस्थ, बांधकाम खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: