खानापूर तालुक्यातील गोल्याळी गावात आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वखर्चातून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

होय, खानापूर तालुक्यातील गोल्याळी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त सुमारे २ लाख रुपये खर्चातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी आ. अंजली निंबाळकर यांनी निधी दिला असून, यांच्याहस्ते या शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी शिवपुतळ्याला अभिषेक घालून पूजन केले. त्यांनी यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन उपस्थितांत उत्साह भरला. याप्रसंगी गोल्याळी तसेच आसपासच्या परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments